शेंदुर्णी । शेंदुर्णी – नाचनखेडा गटातील शेतकर्यांसाठी अनुदानावर विविध योजना शेतकर्यांसाठी जिल्हा परीषद अंतर्गत जि.प.सदस्या सरोजिनी गरूड यांच्या शिफारशी व कोट्यातून गरजू शेतकर्यांना अनेक आवजारे व शेतीउपयोगी वस्तूसाठी संपर्क करण्याचे आवाहन जि.प.सदस्या सरोजिनी गरूड यांनी केले आहे. जिल्हा परिषद सेस योजने अंतर्गत शेंदुर्णी – नाचनखेडा गटातीलशेतकर्यांसाठी 50 टक्के अनुदानावर विविध योजना देण्यात येणार असून यात फवारणीचा चार्जिंग पंप – अनुदान 50 टक्के किंवा रु.2000 मर्यादा, फवारणीचा साधा पंप – अनुदान 50 टक्के किंवा रु.700 मर्यादा, एचडीपीई पाईप – 10 नग – प्रती तीनशे रूपये, सबमर्सिबल इले.पंप (3 किंवा 5 एचपी) – अनुदान 50 टक्के किंवा रु.8000 मर्यादा, 6 मीटर ताडपत्री – अनुदान 50 टक्के किंवा रु.1600 मर्यादा, ट्रॅक्टरसाठी पलटीनांगर – अनुदान 50 टक्के किंवा रु.20000 मर्यादा, तसेच, अनुसूचित जाती व जमातीतील शेतकर्यांसाठी 50 टक्के अनुदानावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजने अंतर्गत नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोरिंग, शेत तळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण, ठिबक सिंचन संच इत्यादी योजना प्रस्तावित आहे.