शेंदूर्णी – येथे जामनेर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अप्पासाहेब र. भा. गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फे ‘माझी आई माझे महाविद्यालय’ अंतर्गत जागर स्त्री शक्तीचा भव्य महिला, युवती संवाद मेळाव्याचे 13 रोजी आयोजन करण्यात आले आहे. आचार्य गजाननराव गरुड विद्यालयात दुपारी दोन वाजता हा मेळावा होणार असून खासदार सुप्रिया सुळे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या आधी अप्पासाहेब र.भा.गरुड महाविद्यालयात डॉक्टर, वकील, व्यापारी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी सोबत सुप्रिया सुळे संवाद साधणार आहेत. वरील सर्व कार्यक्रमासाच्या अध्यक्षस्थानी जळगांव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भय्यासाहेब रवींद्र पाटील राहणार असून माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, आमदार डॉ. सतिष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, हाजी गफ्फार मलिक, माजी खासदार वसंतराव मोरे, विजया पाटील, मंगला पाटील, कल्पिता पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य सरोजिनी संजय गरुड, प्रमिलाताई राघो पाटील व कार्यक्रमाचे संयोजक माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड, दिगंबर पाटील, प्रदीप लोंढा, प्रमोद पाटील यांनी केले आहे.