शेंदुर्णी । येथील गरुड महाविदयालयात पर्यावरण आणि गणेशोत्सव हे ब्रीद अंगिकारत पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मातीची कमी खर्चाची गणेशमुर्ती बसविण्यात आलेली होती व अगदी त्याच पध्दतीने गणपती बाप्पांचे विसर्जन तलावात व विहीरीत न करता, पाण्याच्या एका बकेटमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. कुठल्याही प्रकारचा अनावश्यक खर्च न करता गणेशोत्सवासाठी जमा झालेल्या वर्गणीतून महाविद्यालयातील दोन गरजू विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा गणवेश भेट म्हणून देण्यात येणार आहे. सदर उपक्रमाचे आयोजन पर्यावरणवादी विचारवंत प्राचार्य डॉ. वासूदेव पाटील तसेच महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग व रासेयो विभाग यांच्यामार्फत करण्यात आलेले होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ.वासुदेव पाटील, डॉ.संजय भोळे, डॉ.एस.जे.साळुंखे, प्रा.अमर जावळे, प्रा.ए.एस.महाजन, डॉ.आर डी गवारे, प्रा.महेश पाटील, प्रा.संदिप द्राक्षे, प्रा.दिनेश पाटील, प्रा.भूषण पाटील, शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते. सदर गणेशोत्सव यशस्वीरित्या आयोजित करणेसाठी करुण सुर्वे, जयेश शिंपी, दिपक अजलसोंडे, जगदीश पाटील, सपना कोळी, अजय अस्वार यांनी मेहनत घेतली.