चाळीसगाव । तालुक्यातील दहीवद गणासाठी रविवारी 22 जानेवारी 2017 रोजी शिवसेनेचा मेळावा लोंढे येथे उत्साहात पार पडला. मेळाव्यासाठी दहीवद गणातील व परिसरातील शिवसैनिक, कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी पाचोरा येथील शिवसेनेचे माजी आमदार आर.ओ. पाटील, जेष्ठ नेते तुकाराम मामा कोळी, शिवसेना तालुकाप्रमुख उन्मेश राजपूत, माजी नगरसेवक नंदकिशोर बाविस्कर, हिम्मत निकम, संदीप राठोड, देवचंद साबळे व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना आर.ओ.तात्या पाटील यांनी येणार्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कुठल्याही भूल थापांना बळी न पडता शिवसेनेच्या उमेदवारांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले तर उन्मेष राजपुत यांनी लोकप्रतिनिधी भोळ्या जनतेची दिशाभूल करून फसवणूक करत असल्याचे सांगितले. मेळाव्याचे प्रास्ताविक सूत्र संचालन रवी निकम यांनी केले तर आभार सोनू निकम यांनी मानले.