शेंदुर्णी । राजमल व ताराबाई अग्रवाल यांच्या लग्नाला पन्नास वर्ष पुर्ण होत असल्याने नेत्रक हॉस्पीटल व इंडो अमेरिकन हॉस्पिटल, राजमल बद्रीलाल अग्रवाल परिवार यांच्यातर्फे आरोग्य तपासीण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी 20 रोजी शेंदुर्णी येथील पारस जैन मंगल कार्यालयात शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण, ई.सी.जी., वैद्यकिय सल्ला व औषधोपचार करण्यात येणार आहे. पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांनी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.