शेंदुर्णी : खान्देशचे प्रतिपंढरपुर श्रीत्रिविक्रम नगरीत साधुसंतांनी भक्तीचा मळा फुलवला, येथील स्वातंत्र्य सेनानींनी स्वातंत्र्य लढयात योगदान दिले, सहकार व राजकीय क्षेत्रात गावाने मार्गदर्शकाची भुमिका बजावली तर साहित्य, कला, क्रीडा व संस्कृती जतनाने गावाची ओळख जगाच्या नकाशावर पोहचली अश्या या पावनभुमी शेंदुर्णी नगरीत जन्मलेले रत्न शिक्षणमहर्षी कै.आचार्य बापुसाहेब गजाननराव गरुड यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधुन डिसेंबर 2009 पासुन त्यांच्यानावे दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी त्यांचा 25वा स्मृतीदिन असुन व्याख्यान मालेचे 8वे वर्ष आहे.
विनोदी कविता, आध्यात्म, संस्कृतीवर होणार व्याख्यान
बुधवार 21 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता प्रा.विष्णु सुरासे (हास्यकवी) औरंगाबाद हे ‘विनोदी कवितेतुन सामाजिक प्रबोधन’ या विषयावर व्याख्यान देउन प्रथम पुष्प गुंफुन व्याख्यानमालेची सुरवात करतील, गुरूवार 22 डिसेंबर रात्री 8 वाजता प्रा.प्रकाश एदलाबादकर (जेष्ठ साहित्यीक नागपुर) हे आपल्या वाणीतुन ‘आध्यात्माचे मुक्त आकाश संत मुक्ताबाई’ या विषयावर प्रबोधन करत दुसरे पुष्प गुंफतील तर शुक्रवारी 23 डिसेंबर रात्री 8 वा शेवटचे व तिसरे पुष्प प्राचार्य डॉ.साहेबराव खंदारे (परभणी) हे ‘संस्कृती आणि आधुनिक समाज’ या विषयावर व्याख्यान देउन गुंफतील. वरील सर्व कार्यक्रमाचे येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे प्रांगणात आयोजन करण्यात आले असुन श्रोत्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संजयरावजी गरुड(अध्यक्ष) धी शेंदुर्णी सेकंडरी एज्यु.को-ऑप.सोसा.लि.शेंदुर्णी व व्याख्यानमाला संयोजन समितीचे वतीने करण्यात आले आहे.