शेंदुर्णी येथे गरूड महाविद्यालयात तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा

0

शेंदुर्णी। गरूड महाविद्यालयात नुकतेच तालुकास्तरीय आंतर शालेय कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत माध्यमिक वयोगट 14 व 17 तर कनिष्ठ महाविद्यालयीन वयोगट 19 आहे. जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार झाल्या.

कुस्ती स्पर्धा कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी तालुका क्रिडा समन्वयक आसीफ खान, जि.प. माजी सदस्य सागरमल जैन, पं.स. सदस्य डॉ. किरण सुर्यवंशी, शांताराम गुजर, प्राचार्य डॉ.व्ही.आर. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व कुस्ती स्पर्धा इनडोअर स्टेडीयम मध्ये झाल्या. स्पर्धा सुरू करण्यापूर्वी भगवान श्री. हनुमान, आचार्य गजाननराव गरुड, अण्णासाहेब गरूड यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांनी केले. सुत्रसंचलन व प्रास्ताविक क्रिडा शिक्षक प्रा.आर.जी.पाटील तर आभार, प्रा. महेश पाटील यांनी मानले. तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेतील विजयी खेळाडू – धनंजय देशमुख (वजन 42) गरुड कॉलेज शेंदुर्णी, अमिर शहा कदीर शहा (वजन 46) ज्ञानगंगा हायस्कूल, रोहीत पाटील (वजन 50) धारीवाल कॉलेज, जामनेर यांचा समावेश आहे.