शेंदुर्णी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

0

शेंदुर्णी ।  येथील स्व. सावरकर बहुउद्देशीय संस्था शेंदुर्णी संचलित गुरूकुल वैधकीय प्रतिष्ठान व सत्य साई चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचे वतीने आणि शेंदुर्णी शहर पत्रकार संघ व शेंदुर्णी डॉ.असो. यांच्या सहकार्याने सर्व प्रकारच्या आजारावर मोफत रूग्ण तपासणी व औषधीचे वाटप शिबिराचे आयोजन 7 व 8 ऑगस्ट 17 मंगळवार दुपारी 1ते 5 या वेळेत डॉ. कुलकर्णी हॉस्पिटल गांधी चौक शेंदुर्णी येथे आयोजित करण्यात आले आहे. 9 ऑगस्ट 17 बुधवार रोजी हेच शिबिर गुरूकुल विद्यालय, मोराड रोड शेंदुर्णी येथे होणार आहे. दरचे शिबिराचे यापुढे दर महिन्याला नियमित आयोजित करण्यात येणार गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजयानंद कुलकर्णी, सचिव भक्ती कुलकर्णी यांनी केले आहे.