शेंदुर्णी येथे ललवाणी विद्यालयात आनंद मेळावा

0

शेंदुर्णी । येथील स्व. शेठ राजमल लखीचंद ललवाणी माध्यमिक विद्यालयात शुक्रवार 22 डिसेंबर 17 रोजी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन केंद्रप्रमुख एस.व्ही. कुमावत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक पी.टी. खलचे, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख वाघ, प्राथमिकचे मुख्याध्यापक एस.एस. खोडपे, उपस्थित होते. एस.व्ही कुमावात यांनी उद्घाटन बोलतांना सांगितले की, यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहार कुशलता ज्ञान मिळते व आर्थिक व्यवहार शिकण्यास मिळतात, असे सांगितले.

विद्यार्थ्यांचे खाद्यपदार्थांचे लावले स्टॉल
या मेळाव्यात इयत्ता तिसरी ते आठवीचे विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ विक्रीचे स्टाल लावले होते. त्यांचे स्टालवरून विद्यार्थी व शिक्षकांनी पैसे देऊन पदार्थ विकत घेऊन त्याचा स्वाद घेतला. या आनंद मेळाव्याचे संकल्पना के.टी. चौधरी यांनी मांडून प्रत्यक्षात आणली.