शेंदुर्णी येथे लागलेल्या आगीत दोन दुकाने खाक, लाखोंचे नुकसान

0

शेंदुर्णी । येथील सोयगाव शेंदुर्णी रोडवर स्टेट बँक समोरील विक्रम प्रकाश बडगुजर यांच्या मालकीच्या माऊली आटो गॅरेजमध्ये व शेजारीच असलेल्या राजू गणपत
भोई यांच्या मालकीच्या मच्छी सेंटरला दुपारी 2.30 ते 3 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीने थोड्या वेळातच उग्र रूप धारण केल्याने माऊली आटो
सेंटर व शेजारी असलेल्या मच्छिसेंटर पूर्णपणे जळून खाक झाले आहे. सदर आगीचे लोळ आसमंतात दिसून येताच येथील शेजारच्या मुस्लिम वस्तीतील मुस्लिम
युवकांनी व सप्तशृंगी मित्र मंडळ कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आग इतकी भयंकर होती की, आटो गॅरेज मधील संपूर्ण स्पेअरपार्ट
जळून खाक झाले त्यात अंदाजे अडीचे नुकसान झाले आहे. तर शेजारच्या राजू भोई यांच्या मच्छी सेंटर मधील फ्रीज, मासळी ताजे ठेवणार्‍या शीत पेट्या,
मासेमारीची जाळे अंदाजे दोन लाख व इतर सर्व साहित्य मिळून रुपये 4.5 लाखांचे नुकसान झाले आहे त्यामुळे दोन्ही दुकानदार रस्त्यावर आले घटनास्थळी
ग्रामपंचायतचे वतीने पाण्याचे टँकर मागवून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल , माजी सरपंच सागरमल जैन तसेच नागरिकांनी दिल्या असून शासकीय यंत्रणेकडून पंचनामा करण्याचे काम सुरू होते.