शेंदुर्णी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

0

शेंदुर्णी । येथील ग्रामपंचायतच्या प्रयत्नातून आणि जलसंपदा व वैधकीय शिक्षण मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या सहकार्याने विविध विकास कामे मंजुर झाले असून कामास शुभारंभ करण्यात आला आहे. शेंदुर्णी गावातील 10 मंदिरांची धार्मिक पर्यटन स्थळे म्हणून निवड करण्यात आली आहे. या धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी 16 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यात श्री.महानुभाव दत्त मंदिर (वनदेव) व श्री.स्वामी समर्थ मंदिरांचे कामांचे पायाभरणी समारंभ तसेच प्रभुपुष्प नगरातील अंतर्गत रस्ता खडीकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे हद्दीतील रेल्वे स्टेशन ते बस स्थानक रस्ता रुंदीकरण, काँक्रीटीकरण व डांबरीकरण आदी कामे करण्यात येणार आहे. ही विकास कामे झाल्यानंतर शेंदुर्णी गावाचे रुपडे पालटणार असल्याचे बोलले जात आहे. नागरिकांनी भूमिपूजन व सुरुवात झालेल्या कामे गुणवत्ता पुर्वक व्हावी यासाठी संबंधित अधिकारी वर्गाचे लक्ष वेधले मंजूर आराखड्यानुसारच कामे पूर्ण करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

यांच्याहस्ते शुभारंभ
शेंदुर्णी गावासाठी मंजुर विविध विकास कामाचे उद्घाटन लोकप्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली शेंदुर्णी गावासाठी विविध विकास कामे मंजुर करण्यात आले. कामांचा शुभारंभ विजया खलसे (सरपंच ), साधना महाजन (नगराध्यक्ष, जामनेर), रजनी चव्हाण ( सभापी झेडपी बांधकाम व महिला बाल कल्याण समिती), संगीता पिठोडे ( सभापती पं.स.जामनेर) यांच्या हस्ते यांच्या हस्ते करण्यात आले.

यांची होती उपस्थिती यावेळी शिवाजी सोनार, गोविंद अग्रवाल, उपसरपंच नारायण गुजर, नवल राजपूत, देवचंद बारी, मुक्ता चौधरी, संगीता बारी, अमृत खलसे, मुख्य अभियंता बी. बी.राजपूत, उपअभियंता, एस. व्ही. पाटील, ग्रामसेवक जी. एन. काळे, अशोक बारी, प्रफुल पाटील, सुनील शिणकर, मंदिर ठेकेदार आर. के. शर्मा , ठेकेदार अभिषेक पाटील, विशाल कन्स्ट्रक्शनचे पाटील यांची यावेळी उपस्थिती होती.