शेंदुर्णी येथे श्री चक्रधर स्वामी अवतारदिन महोत्सव

0

शेंदुर्णी। येथील श्री. महानुभाव दत्त मंदिर संस्थानतर्फे बुधवारी 23 ऑगस्ट रोजी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन भाद्रपद शु.॥2 दत्त मंदिर संस्थान शेंदुर्णी येथे साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य मंदिरात संजय गरुड यांच्याहस्ते तर वनदेव मंदिरात रतनराव यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महास्थानाचे पूजन सरपंच विजयाताई खलसे यांनी केले. महास्थानास श्री सागरमल जैन व श्री अमृत खलसे यांचे हस्तेवस्त्र अर्पण करून धर्म सभा घेण्यात आली. त्याचे अध्यक्ष स्थानी हभप श्री. शांताराम भगत यांनी भूषविले यावेळी हभप कडोबा माळी यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
कार्यक्रमात सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील मान्यवर महानुभाव पंथाचे अनुयायी उपस्थित होते. यावेळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली व महाप्रसादाचे वाटपाचा कार्यक्रम झाला. वरील सर्व कार्यक्रमाचे आयोजन महानुभाव दत्त मंदिर संथान अध्यक्ष श्री गोविंदभाई अग्रवाल, उपाध्यक्ष रातनराव जाधव, सचिव अमृत पाटील, सहसचिव प्रमोद कासार, कोषध्यक्ष ए.एल. पाटील, सदस्य आबा बारी, गणेश महाले, कन्हैया गुजर, धनराज नाथ, शांताराम सोनवणे, भास्कर गुजर, उषाबाई देशमुख, दिगम्बर देशमुख व सर्व उपदेशी महानुभाव पंथाचे भक्त मंडळीतर्फे करण्यात आले आहे.