शेंदुर्णी । येथे आगामी गणेशोत्सव व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रामुख्याने, उपविभागीय पोलीस अधिकारी केशवराव पातोंड, पहुर पोलीस स्टेशन प्रभारी, स.पो.नि. मोहन बोरसे, हनुमंतराव गायकवाड, संजय गरुड, पं.स.सदस्य डॉ.किरण सूर्यवंशी, उपसरपंच नारायण गुजर, युवा नेते यशवंत पाटील, माजी पं.स.सदस्य सुधाकर बारी, शांताराम गुजर, टी.के. पाटील , परिसरातील सरपंच, पोलीस पाटील उपस्थित होते.
शांतता राखण्यासाठी सहकार्याचे केले आवाहन
यावेळी शांततेत सण उत्सव साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी शांतता भंग करणार्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. आगामी काळात येणारे हिंदू मुस्लिम सण मोठ्या उत्साहात साजरे करा, पण इतरांना त्रास होईल किंवा धार्मिक भावना दुखावल्या जातील, असे वर्तन करू नका असा सल्लाही दिला, उपविभागीय पोलिस अधिकारी केशवराव पातोंड यांनी शांतता समितीचे सभेत नागरिकांनी केलेल्या सूचनानुसार कार्यवाही करण्याचे आदेश सपोनि मोहन बोरसे यांना देऊन शांतता राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. मोहन बोरसे यांनी गणेशोत्सव साजरा करताना नियमावली पाळण्यात यावी. यासाठी गणेश मंडळांना सूचना केल्या, शेवटी शेंदुर्णी दुरक्षेत्राचे स.पो.नि.हनुमंतराव गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.