शेंदूर्णीत सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी

0

शेंदूर्णी: संपूर्ण देशात कोरोना संसर्ग रोगामुळे भीतीचे वातावरण आहे राज्यातील प्रत्येक जिल्हा शहर, गाव व खेड्यात कोरोना विषाणूचा फैलाव व संसर्ग होऊ नये म्हणून राज्य सरकारने शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. दरम्यान शेंदूर्णी नगरपंचायतींतर्फे संपूर्ण गावातील मुख्य गल्ल्यांमध्ये सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे. त्यासाठी खास फवारणी यंत्र मागविण्यात आले असून गावातील मुख्य रस्त्यावर फवारणी करण्यात येत आहे. त्यासाठी नगराध्यक्षा विजया खलसे यांच्या देखरेखीखाली उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक आपापल्या प्रभागात फवारणी करून घेत आहे. मुख्याधिकारी साजिद पिंजारी ,नगर अभियंता भय्यासाहेब पाटील, पाणीपुरवठा अभियंता काझी,यांच्यासह नगरपंचायत स्वच्छता विभागाचे कर्मचारी फवारणीसाठी मेहनत घेत आहेत.