शेंदुर्णी । प्रतिपंढरपूर शेंदूर्णी नगरीत गेल्या 284 वर्षांपासून विठ्ठल भक्त पांडुरंगाचे दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने आषाढी एकादशीला विठ्ठल नामाचा गजर करत ’त्रिविकम भगवान की जय’ ’कडोबा महाराज की जय’ रात्री 2 वाजेपासून दर्शनासाठी किमान 2 तास रांगेत उभे राहून दर्शन घेतात. गर्दीमुळे आपल्या बालगोपालांना दर्शन करवून आणणे शक्य होत नाही म्हणून येथील सरस्वती विद्यालय व श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय गेल्या 10/12 वर्षांपासून आपल्या विद्यार्थ्यांना आषाढीचे दोन दिवस आधीच दिंडीच्या माध्यमातून पांडुरंग रुपी श्री त्रिविक्रम भगवानचे श्री त्रिविक्रम भगवान की जय, कडोबा महाराज जय म्हणत सरस्वती विद्या मंदिर व श्रीकृष्ण माध्य विद्यालयातील विद्यार्थ्याना आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर दर्शन घडवून आणले जाते. शनिवार 21 रोजी या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
टाळ मृंदुगांच्या गजरात पर्यावरणाचा दिला संदेश
शाळेच्या प्रांगणात सुरुवातीला संस्थेच्या अध्यक्षा डॉ.कौमुदी साने यांनी पालखीतील विठ्ठलाच्या प्रतिमेचे पुजन करून आरती केली. त्यानंतर दिंडीला सुरुवात झाली. यावेळी संस्थेचे सचिव कांतीलाल ललवाणी, कौस्तुभ शिरोडकर, नम्रता शिरोडकर, मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, शिला पाटील व आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठलनामाचा जयघोष करत टाळ मृंदुगांच्या गजरात लेझिम टिपर्या खेळत हातात भगव्या पताका हातात घेऊन भक्तीचा संदेश देतांनाच वृक्ष दिंडीचे आयोजन करून गावातील नागरिकांना पर्यावरण संरक्षण संदेश देत ऐतिहासीक ‘त्रिविक्रम भगवान’ मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली.
वृक्ष दिंडीच्या माध्यमातून जनजागृती
दिंडीच्या अग्रभागी अश्वरूढ विद्यार्थीनी, बालक स्वरूपातील विठ्ठल रुख्मीणी संत तुकाराम, संत निवृती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताताबाई त्यामागे संत मंडळी व हातात सामाजीक संदेश फलक घेतलेले तसेच विठूनामाचा गजर करणारे बाल वारकरी इतर मुले कपाळी बुक्का, गंध पांरपारिक वारकरी वेषात टाळ मृदुंग घेऊन, लेझीम, ध्वजपथकाचे उत्कृष्ट प्रात्यक्षिके सादर केली. वृक्षदिंडी, भजन अंभग, भारूडे, सादरीकरण करून राज्य शासनाचा एकच लक्ष्य 13 कोटी वृक्ष हा संदेश वृक्ष दिंडीच्या माध्यमातून विदयार्थ्यानी नागरीकांपर्यंत प्रभावीपणे पोहचवीला. या दिंडी आयोजनात शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्याने लाभले.