शेंदूर्णी येथील नगर एकता गणेशोत्सव मंडळास प्रथम पारितोषिक

0

शेंदूर्णी । पहूर पोलीस स्टेशनतर्फे गेल्या दोन वर्षांपासून वाघूर गणेशोत्सव बक्षिस योजना येथील प्रभारी सहाय्यक पोलीस निरिक्षक मोहन बोरसे, सहाय्यक पो.नि. हनुंमतराव गायकवाड, पी.एस.आय. शिवाजी नागवे यांच्याकडून राबविण्यात येत आहे. मागील वर्षी रोख बक्षीसे देण्यात आली होती. यावेळी ए.पी. दत्तात्रय कराळे, एएसपी प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड यांच्याहस्ते गौरविण्यात आले. यावेळी भाजपा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे, जि.प. माजी सभापती प्रदीप लोढा, बाळुराव घोंगडे (मा.प.स. सभापती), शाम साळुंखे, डॉ. विजयानंद कुळकर्णी, एका पहेलवान आदी मान्यवर उपस्थित होते.

शहरातील या मंडळांना मिळाला पुरस्कार
यावेळी शेंदूर्णी येथील नगर एकता गणेशत्सव मंडळास प्रथम पारीतोषिक तर युवक (बाल) गणेशोत्सव मंडळात द्वितीय, त्रिविक्रम गणेश मंडळास तृतीय तर एकता गणेश मित्र मंडळ (संभाजीनगर) यांना उत्तेजणार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आहे. तर उत्कृष्ठ विसर्जन मिरवणुकीचा पुरस्कार येथील. साईनाथ गणेश मंडळास देण्यात आला. यानंतर पहूर येथील आदर्श त्रिमुर्ती गणेश मंडळ प्रथम न्युगणेश मित्र मंडळ द्वितीय छत्रपती शिवाजी आदर्श गणेश मंडळ तृतीय बक्षीसाचे मानकरी ठरले. यावेळी शिवाजी राजे गणेश मंडळात उत्तेजनार्थ तर जय मल्हार अहिल्यादेवी होळकर गणेश मंडळास उत्कृष्ठ मिरवणुकीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय कर्‍हाळे, अप्पार पोलीस अधिक्षक प्रशांत, केशव पातोंड यांचा प्रदिप लोढा, गोविंद अग्रवाल, राजधर पांढरे, बाळूराव घोंगडे व पंडिता लोहते यांनी सत्कार केला. याच कार्यक्रमात पत्रकाराचे वतीने गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध करणारे निवेदन जिल्हा पोलीस अधिक्षक यांना पत्रकार अशोक जेन, शरद बेल पत्रे, विलास अहिरे, सादिक शेख, शरद लोढ यांचे हस्ते देण्यात आले.

प्रशासनाने मानले आभार
जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी पहूर पोलीस स्टेशन अतंर्गत येत असलेल्या 80 गावांच्या नागरिकांचे विशेष आभार मानुन कमी मनुष्यबळ असतांनाही येथील शातंता व सलोखा कायम ठेवण्यास प्रभारी पोलिस अधिकारी मोहन बोरसे व त्यांच्या पोलीस कर्मचार्‍यांना यश असून नागरीकच शांतता प्रिय असल्याची ती पावती असल्याचे सांगत सोशल मीडियावर बळी न पडण्याचे आवाहन केले.