शेअर्स विक्रीला अधिक प्राधान्य; सेन्सेक्स कोसळला

0

मुंबई : कोरोनाचा शेअर मार्केटवरही विपरीत परिणाम दिसून येत आहे. सर्वच क्षेत्र आर्थिक संकटात सापडले आहे. आज सोमवारी शेअर मार्केट उघडताच विपरीत परिणाम दिसून आले. गुंतवणूकदारांनी आज शेअर्सची विक्री करून नफा वसुलीला प्राध्यान दिल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीवर विक्रीचा दबाव दिसून आला. सेन्सेक्समध्ये ४५० अंकांची घसरण झाली. सध्या सेन्सेक्स ३७ हजार १९९ वर आहे. निफ्टीतही घसरण पाहायला मिळाले आहे. ९८ अंकाच्या घसरणीसह निफ्टी १० हजार ९७४ वर आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या १८ लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे आर्थिक संकट अधिक वाढले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचे कोणतेही चिन्ह नसल्याने शेअर मार्केटमध्ये विक्रीला अधिक प्राधान्य देण्यात येत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात चार महिन्यांपासून लॉकडाउन ठेवला होता. मात्र त्यानंतर करोना रुग्णवाढीचा आलेख वरती जात आहे. लॉकडाउनमध्ये उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे.

सध्या बाजारात टाटा मोटर्स, एसबीआय, येस बँक, अशोक लेलँड, कॅडिला हेल्थकेअर आदी शेअर तेजीत आहेत. रिलायन्स, एचडीएफसी बँक, कोटक बँक, टीसीएस,इन्फोसिस , एक्सिस बँक, एचडीएफसी, टीसीएस, एल अँड टी या शेअरमध्ये घसरण झाली आहे.