शेअर बाजारातील व्यवहारात ‘आधार’ची सक्ती

0

मुंबई : शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधार नंबर सक्तीचा केला जाऊ शकतो. केंद्र सरकार आणि वित्तीय नियमन करणारी सेबी या योजनेवर विचार करीत करीत आहेत. असे झाले तर शेअर बाजारात काळा पैसा पांढरा करणार्‍यांना लगाम बसणार आहे. केंद्र सरकारच्या लक्षात आले आहे की पॅन कार्ड टॅक्स चोरी थांबवू शकत नाही. आधारचा वित्त व्यवहारांमध्ये अंतर्भाव केल्यास काय होऊ शकते याची चाचपणी सरकारने सुरू केलेली आहे. आधार कार्ड नक्की कधी उपयोगात आणले जाईल हे माहित नसले तरी असे झाल्यास आधार अत्यंत महत्वाचा दस्तऐवज बनणार आहे.