नवी दिल्ली- बुधवारी सकाळी शेअर बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर तेजी पहावयास मिळाली. कामकाज सुरु झाल्यानंतर सेंसेक्स ३५ हजार ८०० च्या पार गेले आहे. सेंसेक्स १२२ अंकांनी मजबूत होऊन ३५ हजार ८१४ वर पोहोचले आहे. तसेच निफ्टी ४५ अंकांनी मजबूत होऊन १० हजार ८८७ वर पोहोचले आहे. दरम्यान बँक आणि फार्मा इंडेक्समध्ये सर्वात जास्त तेजी पहावयास मिळत आहे.
मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांच्या भेटीनंतर शेअर बाजारात सकारात्मक चित्र निर्माण झाले होते. हे चित्र कायम आहे. ४ महिन्यानंतर प्रथमच तेजी पहावयास मिळत आहे.
रुपये ११ पैशांनी कमजोर
गेल्या चार महिन्यापासून वाढलेल्या महागाईचा उच्च स्तरामुळे रुपयाचे अवमूल्यन होत आहे. बुधवारी ते कायम राहिले. डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन रुपया ११ पैशांनी पुन्हा कमजोर झाला आहे. आज ६७.५९ रुपये डॉलरच्या किमतीत रुपयाची किंमत आहे.