मुंबई – शेअर बाजार निर्देशांक 164 अंकांच्या तेजीने 29820 च्या पातळीवर तर निफ्टी निर्देशांक 44 अंकांच्या तेजीने 9262 अंकांच्या पातळीवर पोहोचला.
आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये तेजीचे वातावरण असल्यामुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवातीलाच शेअर बाजाराने जबरदस्त उसळी मारली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 164 अंक वधारून 29820 अंकांवर तर निफ्टीचा निर्देशांक 44 अंकांच्या तेजीने 9262 च्या पातळीवर पोहोचला.
दोन्ही शेअर बाजारांच्या निर्देशांकांमध्ये अर्ध्या टक्क्यांची आघाडी पाहायला मिळत आहे. व्यापारामध्ये निफ्टीने 9,279.80 या नव्या उच्चांकी पातळीला गाठले. दरम्यान, बँक निफ्टीने आतापर्यंतचा उच्चांकी स्तर गाठला आहे. बँक निफ्टीचा निर्देशांकने 21,986.95 अंकांची पातळी गाठली. राष्ट्रीय शेअर बाजारात मिडकॅप 0.56 टक्के आणि स्मॉलकॅप 0.71 टक्के तेजी दिसून येत आहे.