नवी दिल्लीः शेअर बाजारात आज गुरुवारी कमालीची उसळी पाहायला मिळाली. अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार करारावर पहिल्या टप्प्यात हस्ताक्षर झाल्याचे परिणाम शेअर बाजारात जाणवत आहे. शेअर बाजाराचा सेंसेक्स 187 अंकांच्या वाढीसह 42059.45 स्तरावर पोहोचला होता. तर निफ्टी 9.70 अंक म्हणजे 0.08 टक्क्यांनी वाढून 12,353च्या स्तरावर खुलला. प्रथमच सेंसेक्स 42 हजाराच्या पुढे गेला आहे.
दोन्ही देशांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील चर्चासुद्धा सुरू झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात सकारात्मक चर्चा झाल्यानंतर टॅरिफ हटवण्यात येणार आहे. दोन्ही देशांमध्ये IPR प्रकरणातही सहमती झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील करारानंतर चीनकडून टॅरिफ हटवले जाणार आहे. चीनवर यापुढे दबाव राहणार आहे. त्यामुळे सध्या तरी टॅरिफ हटवण्याचा कोणताही उद्देश नाही. दुसऱ्या टप्प्यातील करारानंतर हे टॅरिफ हटवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बाजारात उत्साह आहे.