मुंबई-शेअर बाजाराने बुधवारी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. बीएसई सेन्सेक्स २२१ अंकांच्या तेजीसह ३७८८७ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सची आतापर्यंतची ही सर्वोच्च कामगिरी ठरली. निफ्टीही ६०.५५ अंकांच्या तेजीसह ११४५० वर बंद झाला. सेन्सेक्स ९०.४४ अंकांनी उसळला होता. तर निफ्टी ३३.७ अंकाच्या तेजीसह उघडला होता.
निफ्टीनेही पहिल्यांदाच ११४५७ ची पातळी गाठली होती. आरआयएल, एचयूएल, कोटक बँक, एचडीएफसी बँक, ओएनजीसी, आयसीआयसी बँक, टीसीएसच्या शेअरने चांगली कामगिरी केली. दिवसाअखेरीस सेन्सेक्स २२१ अंकाच्या तेजीसह ३७८८७.५६ या विक्रमी स्तरावर बंद झाला. तर निफ्टीही ६०.५५ अंकाने वाढवून पहिल्यांदाच ११४५० अंकांपर्यंत पोहोचला. या विक्रमी उंचीने शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.