मुंबई : कोरोनामुळे काही दिवसांपासून मंदीचे सावट दिसून येत होते. मात्र गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचा वातावरण निर्माण झाला असून खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे आज बुधवारी ५ ऑगस्ट रोजी मार्केट सुरु झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये ४०० अंकांची वाढ होऊन पुन्हा ३८००० अंकांचा टप्पा ओलांडला आहे. निफ्टीत देखील ११५ अंकांची वाढ झाली असून तो ११२१० अंकांवर आहे. सोमवारी शेअर मार्केटच्या सेन्सेक्समध्ये पडझड झाली होती. त्यानंतर काल मंगळवारी सेन्सेक्स ७४८ अंकांनी वाढला. यामुळे गुंतवणूकदारांची मालमत्ता किमान तीन लाख कोटींनी वाढली आहे. या अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी पॅकेज जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभरातील भांडवली बाजारात उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.
बाजार उघडताच बँका, वित्त संस्था, ऑटो, आयटी या क्षेत्रात खरेदी दिसून आली. आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, इंडसइंड बँक, टाटा स्टील, ऍक्सिस बँक, रिलायन्स, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट , कोटक बँक, एसबीआय, बजाज ऑटो, टायटन, एल अँड टी, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी, आयटीसी शेअर तेजीत आहेत. एचयूएल, नेस्ले, पॉवर ग्रीड या शेअरवर दबाव दिसून आला.