शेकडो भक्तांनी केले श्रीमोरया गोसावी चरित्र पठण

0

पिंपरी-चिंचवड : श्रीमन महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्यास उत्साहात सुरुवात झाली आहे. या सोहळ्यात दररोज सकाळी आठ ते नऊ या वेळेत श्रीमोरया गोसावी चरित्र पठण करण्यात येत आहे. चरित्र पठणाचा आज दुसरा दिवस होता. परिसरातील शेकडो मोरया भक्तांनी या चरित्र पठणाचा लाभ घेतला. श्रीमोरया गोसावी चरित्र पठण सतीश कुलकर्णी यांनी केले. या चरित्र पठणाचे संयोजन किसनराव पाटील यांनी केले आहे.

चरित्र पठणानंतर सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत गुरुचरित्र पठण करण्यात आले. गुरुचरित्र पठणाचे व्यासपीठ चालक बक्षी गुरुजी असून याचे निरुपण प्रवचनकार ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवा यांनी केले. हे गुरुचरित्र पठण रविवार (दि. 3 डिसेंबर) पर्यंत होणार आहे. दुपारी सिद्धकला भजनी मंडळाचे भजन झाले. तर रात्री गणेशवाडी कोल्हापूर येथील ह.भ.प. नारायण श्रीपाद काणे यांचे नारदीय कीर्तन होणार आहे.

बुधवारचे कार्यक्रम
सकाळी आठ ते नऊ : श्रीमोरया गोसावी चरित्र पठण
नऊ ते बारा : गुरुचरित्र पठण
दुपारी एक ते दोन आणि तीन ते साडेचार : विविध भजनी मंडळांची भजने
सायंकाळी पाच ते सात – गुरुचरित्र निरूपण
रात्री आठ ते नऊ : ह.भ.प. नारायण श्रीपाद काणे महाराज यांचे नारदीय कीर्तन