शेकापच्या आश्‍विनी कुरुंगळे भाजपात

0

पनवेल । शेकापच्या कारभाराला कंटाळून सावळे ग्रामपंचायतीच्या सदस्या आश्‍विनी अरुण कुरुंगळे यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करीत शेकापला जोरदार हादरा दिला. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांना भाजपात प्रवेश देण्यात आला.

पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात गुरुवारी झालेल्या या पक्षप्रवेशास भाजपचे तालुकाध्यक्ष सावळे ग्रामपंचायतीचे मा. सरपंच डॉ. अविनाश गाताडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष माळी, शिवाजी माळी, सदस्या सुजाता माळी, अमृता म्हस्कर तसेच युवा नेते सुनिल माळी, भालचंद्र म्हस्कर, सीताराम माळी, कमलाकर माळी आदी उपस्थित होते.