पोलादपूर : शेतकरी कामगार पक्षाने रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये 25 वर्षांनंतर विजयश्री संपादन केल्यानंतर आगामी ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी पक्षसंघटना अधिक जोमाने कार्यरत करण्यासाठी पक्षाच्या तालुका चिटणीस पदी मोरगिरीचे माजी सरपंच जगन्नाथ वाडकर यांनी एकमताने निवड झाल्याची माहिती शेकापक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा चिटणीस तथा रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अॅड. आस्वाद तथा पप्पूशेठ पाटील यांनी दिली.
पोलादपूर तालुक्यातील देवळे जि.प.गटातून रायगड जिल्हा परिषदेवर सुमन कुंभार आणि गोवेले पं.स.गणातून नंदा चांदे यांची निवड झाल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीवर वैभव चांदे आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर एकनाथ गायकवाड यांनी संचालकपदी निवड झाली.