चिंचवड : शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनच्या वतीने जागतिक जल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभाग क्रमांक 17 मध्ये (चिंचवडेनगर) हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमप्रसंगी पवनामाईचे जलपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला नगरसेविका करुणा चिंचवडे, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे, अतुल क्षीरसागर, बबनराव चिंचवडे, आशा चिंचवडे, वैशाली कदम, विद्या महाजन, रोहिणी माने यांच्यासह जिजाऊ महिला बचत महासंघ, सावित्रीबाई महिला बचत महासंघ, अहिल्यादेवी महिला बचत महासंघ, राणी लक्ष्मीबाई बचत महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पाणी बचतीची सवय लावा
या कार्यक्रमप्रसंगी ‘पाणी वाचवा’ या विषयावर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून पाणी बचत केली पाहिजे. पाणी बचतीची प्रत्येकाने सवय लावली पाहिजे. भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार नाही, यासाठी आताच उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे आवाहन तांबे यांनी उपस्थितांना केले.