प्रभाग क्रमांक 17 ला मॉडेल वॉर्ड करण्याच्या दिशेने एक पाऊल
रावेत : चिंचवडेनगर येथील शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन आणि नगरसेविका करुणा चिंचवडे यांनी प्रभाग क्रमांक 17 ला मॉडेल वॉर्ड करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. ‘आठवड्यातून एक दिवस… माझ्या घराच्या स्वच्छतेसाठी… प्रभागाच्या विकासासाठी…’, ‘एक पाऊल… प्रभागाच्या विकासासाठी…’, ‘व्हिजन 2017-2022’, असे आवाहन करत त्यांनी प्रभागात नुकतेच स्वच्छता अभियान राबविले. सिद्धीविनायक कॉलनी ते औदुंबर कॉलनी दरम्यान हे अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानात तरुणांचा सहभाग लक्षणीय होता.
यांची होती उपस्थिती
यावेळी नगरसेविका करुणा चिंचवडे, शेखर चिंचवडे, गणेश बोरा, संस्कार प्रतिष्ठानचे संदीप रांगोळे, सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजमगुंडे, गौरव शेवाळे, यशराज चिंचवडे, शिवाजी इबितदार, राज अंतुर्लीकर, अतुल वर्पे, वैशाली कदम, पिंकी अडागळे, शिरीष कर्णिक, दरवडे, उज्जेनवाल, सरोदे, शिंदे यांच्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी स्वच्छतेबाबत प्रबोधन केले. सर्वांनी स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवत परिसरात साफसफाई केली.