शेख, पाटील यांना पीएसआयपदी पदोन्नती

0

जळगाव । पोलिस दलाच्या खातेतंर्गत सन 2013 मध्ये घेण्यात आलेल्या विभागीय अर्हता परिक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील पोलिस हेडकॉन्स्टेबल अनिसोद्दीन शेख व जिजाबराव पाटील यांची पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे. याबाबतचे मुंबई पोलिस महासंचालकांनी 26 मे रोजी आदेश जारी केले आहे.

राज्यभरातील 214 जणांना पदोन्नती
सन 2013 मध्ये पोलिस दलातर्फे खातेतंर्गत विभागीय अर्हता परिक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर काही कारणास्तव या परिक्षांचा निकाल जाहिर करण्यात आला नव्हता. परंतू या परिक्षेचा निकाल नुकत्याच काही दिवसांपूर्वी जाहिर करण्यात आले असून यात महाराष्ट्र राज्यभरातील 214 पोलिसांची पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. दरम्यान, या 214 पोलिसांमध्ये शहर पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल अनिसोद्दीन अहमद शेख व फैजपुर पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल जिजाबराव पंढरी पाटील यांचीही पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. यातच निवडीतचे आदेश मुंबई पोलिस महासंचालक यांनी 26 मे रोजी जारी केले आहेत. पोहेकॉ. अनिस शेख व पोहेकॉ. जिजाबराव पाटील हे गेल्या 32 वर्षांपासून पोलिस खात्यात सेवा देत आहेत.