शेगाव । श्रीश्रेत्र शेगावात पंढरपूर येथून परतलेल्या पालखीचे रविवारी अतिशय भावपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यासोबत ‘गण गण गणात बोते’ या मंत्राचा जप करत लाखो भाविकदेखील शेगाव नगरीत दाखल झाले. पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. पालखी रेल्वे स्टेशन शिवाजी चौक शिवाजी चौक मार्गे मंदिरात गेली तेथे महाआरती होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
दर्शनासाठी गर्दी
आषाढी एकादशीला विठुरायाची भेट झाल्यानंतर श्रींच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरू झाला. रविवारी सकाऴी पालखी संत गजानन महाराज कॉलेज जवऴ आल्यानंतर शिवशंकरभाऊ पाटील यांनी पालखीचे स्वॉगत केले.दूपारी 1 वाजता कॉलेज मधुन गजानन वाटीका मार्गे पालखी मंदीराकडे रवाना झाली. विविध मंडऴांच्या वतीने भाविकांना अल्पोपहार व चहापानाचे वाटप करण्यात आले पालखीसोबत बँड पथक, शाऴकरी विद्यार्थी, संत गजानन महाराजांची पालखी विविध फुलांनी सजविण्यात आली होता.