राजपूत महिला भगिनींचा उत्स्फुर्त सहभाग, अनेक मान्यवरांची उपस्थिती
शेगाव: अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, महाराष्ट्र प्रदेश आयोजित शेगाव येथे नुकतेच आयोजन करण्यात आले. राज्यस्तरीय अधिवेशनात राजपूत महिला, समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तणे सहभाग नोंदविला. शेगाव येथील मथुरा लॉन्स सभागृहात अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातून समाज बांधव सकाळपासून मोठ्या संख्येने हजर होते. हिंदू सूर्य महाराणा प्रताप की जय, माँ पद्मावती की जय, या घोषणांनी संपूर्ण सभागृह दुमदुमून गेले.
महाराणा प्रताप, मा पद्मावती यांचे विचार प्रेरणादायी
संत गजानन महाराज, महाराणा प्रताप, पद्मावती राणी यांच्या प्रतिमापूजन, दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात, भारती सिसोदिया यांनी अधिवेशन आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रीय अध्यक्ष माजी खा. हरिवंश सिंह ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून अधिवेशनास उपस्थित सर्व समाज बांधवांना संबोधित केले. यात त्यांनी राजपूत समाज संघटन करत सर्वांना सोबत घेऊन विधायक कार्य करण्याच्या संदर्भात हिंदू सूर्य महाराणा प्रताप, मा पद्मावती यांचे प्रेरणादायी विचारांचे ऐतिहासिक कथन करत मार्गदर्शन केले.
यांची होती उपस्थिती
अधिवेशनास प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खा. हरिवंश सिंह ठाकूर, राष्ट्रीय विरांगणा महिला अध्यक्ष दमयंती रॉय, अभाक्षम तो प्रदेश सलाहकार मार्गदर्शक तथा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ठा. राजेंद्रसिंह राजपूत, राष्ट्रीय युवा अध्यक्ष डॉ. भागवत राजपूत महिला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उज्वला पाटिल, खामगाव माजी नगराध्यक्ष अलकादेवी सानंदा, घाटंजीच्या नगराध्यक्षा नयना ठाकूर, अमरावती विभागीय महिला अध्यक्ष भारती सिसोदिया, नाशिक विभागीय युवा अध्यक्ष संग्रामसिंह सुर्यवंशी उपस्थित होते.
महिला अधिवेशन काळाची गरज
मार्गदर्शक माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांनी महिला अधिवेशन आयोजन करण्याचा स्तुत्य उपक्रम असून, राजपूत महिलांनी एकत्र येत विचारांची देवाण-घेवाण करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी व्यासपीठ मिळत असल्याचे सांगितले. अध्यक्ष राजेंद्र सिंह राजपूत यांनी महिला अधिवेशन काळाची गरज असल्याचे सांगत संघटनेच्या कार्यात महिला, युवती, युवांनी हिरीरीने सहभाग घेण्याचे आवाहन केले.
यांनी घेतले परिश्रम
अधिवेशनास मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, नांदेड, औरंगाबाद अशा विविध विभागनिहाय पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा महाराष्ट्र प्रदेशचे सर्व पदाधिकारी, महिला आणि युवा पदाधिकारी, मिडिया प्रमुख स्वामी पाटील, युवा संगठनमंत्री अभयसिंह राजपूत, परिश्रम घेतले. सूत्रसंचालन वरिष्ठ संगठन मंत्री प्रदेश महिला प्रकोष्ठ सुनिता राजपूत, प्रदेश कार्यकारी सदस्य डाँ. रतनसिंह यांनी तर आभार उज्वला पाटील यांनी मानले.