शेजवळकर नगरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

0

चाळीसगाव । शहरातील भडगावरोड, पुर्णपात्रे विद्यालयासमोरील नगरपालिका हद्दीतील परीसरात गटारी अनेक महिन्यांपासून स्वच्छ केलेल्या नाही. गटारीतील पाणी खुल्या जागेंवर साचून परीसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शेजवळकर नगर व परीसरातील गटारी अनेक वर्षापासून नादुरूस्त आहे. रस्ते स्वच्छ होत नाही. त्यातच असलेल्या व तुटलेल्या गटारी स्वच्छ न केल्याने त्यातून वाहनारे पाणी परीसरातील खुल्या जागेवर साचत आहे. तुटलेल्या गटारीच्या दोन्ही बाजूंनी गवत वाढले आहे. त्यामुळे पाणी वाहत नाही.

परिसरात स्वच्छता करण्याची मागणी
साचलेल्या पाण्यामुळे डास, दुर्गंधी, विषाशी किटक, साप यांचा उपद्रव वाढला आहे. याबाबत नगराध्यक्ष, नगरसेवक, आरोग्य निरीक्षक यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही याचा दखल घेतली जात नाही. संभाव्य अस्वच्छतेमुळे परीसरात रोगराई पासरून गंभीर आजार व दुदैवी घटना होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. पालिकेने यांची दखल न घेतल्यास परीसरातील नागरीक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. घडणार्‍या दुदैवी घटनेस नगरपालिका प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा येथील स्थानिक रहिवाश्यांनी केला आहे.