शेट्टींना रोखण्याचा इरादा

0

राज्यभरात शेतकरी प्रश्‍नांवर लढणारे नेते वाढले; मात्र एकमत नाही

स्वाभिमानीच्या बालेकिल्ल्यात राजकीय संघर्ष रंगणार

कोल्हापूर । शेतकरी संघटनांचे पीक उदंड झाले असताना त्यात आता कृषी राज्यमंत्री असलेले सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेची भर पडली आहे. एखाद्या मंत्र्याने संघटना स्थापन करण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याने तो कितपत तडीस जाणार याची उत्सुकता आहे. उक्ती – कृतीचा मेळ किती उत्तम प्रकारे बसतो यावर संघटनेचे यश अवलंबून असणार आहे. मुख्य म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापुरात संघटनेची घोषणा करतानाच खोत यांनी शेट्टी यांना नामोहरम करण्याचा इरादा व्यक्त केल्याने यापुढे शेट्टी विरुद्ध खोत असा संघर्ष राजकीय मळ्यात रंगणार आहे. यात कोण कोणावर कशी मात करतो याला आगामी काळात महत्व प्राप्त होणार आहे. संघर्षात खोतांचे योगदान महत्वाचे अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात शेतकरी संघटनांचे अस्तित्व उल्लेखनीय मानले जाते. शेतीचे शास्त्रीय भाषेत अर्थशास्त्र उलघडून दाखवून शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेचे बीजारोपण केले. त्यांची संघटना राज्यातच नव्हे तर देशात चर्चेचा विषय बनली. पुढे या संघटनेची राजकीय बैठक कोणती यावरून वाद झाला आणि शेतकरी संघटनांच्या वेगवेगळ्या चुली पेटू लागल्या. पाचगणी येथे पंधरा वर्षांपूर्वी झालेल्या शेतकरी संघटनेच्या सभेत शरद जोशी यांनी भाजपला पाठिबा दिल्याने राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात स्वतंत्र संघटनेची स्थापना केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना हे नाव देऊन जोमाने काम केल्याने कोल्हापूर जिल्ह्यत या संघटनेला बाळसे आले. त्यांचा राजकीय प्रवासही शिवार ते संसद असा झाला. तर , रघुनाथदादा पाटील यांनी वेगळी संघटना चालवली. शरद जोशींच्या पश्च्यात त्यांच्या अनुयायांनी शेतकरी संघटना प्रवाही ठेवली. खेरीज, राज्यभर अनेक शेतकरी संघटनांचे पेव फुटले. यात सर्वात प्रभावी संघटना ठरली ती राजू शेट्टी यांची. स्वाभिमानी शेतकरी संघटना. अर्थात हि संघटना वाढण्यास शेट्टी यांना मोठे योगदान दिले ते सदाभाऊ खोत यांनी.

सत्तेतून खोत यांनी शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवून दाखवावे. कालपर्यंत सामान्य शेतकरी असणारे खोत यांनी शेतीतून वैभव कसे मिळवले याचे रहस्यही त्यांनी सामान्य शेतकर्‍यांना उलगडून दाखवावे. – योगेश पांडेशरद

जोशी यांच्या शेतकरी संघटनेच्या नावाशी नाते सांगणारे शेट्टी, रघुनाथदादा यांनी शेतकर्‍यांचे कसलेही कल्याण केले नाही. आता खोत काय प्रकाश पाडणार. – संजय कोले

मंत्री आणि शत्रुत्व
शेट्टी यांनी आपल्याप्रमाणे खोत यांनीही दिल्ली सर करावी असे स्वप्न पाहिले . माढ्यात खासदारकीच्या निवडणुकीत पराभव झाल्यावर खोत भाजपच्या कोट्यातून आमदार , मंत्री झाले . याला शेट्टी यांचे सहकार्य महत्वपूर्ण होते . पण हाच प्रवास दोघात दुरावा निर्माण करण्यास कारणीभूत ठरला . मंत्री झाल्यानंतर सदाभाऊंनी फडणवीस यांच्याशी जवळीक वाढविली पण संघटनेचे कार्यकर्ते दुरावले खोत यांनी जशास तसे प्रत्युत्तर देत रयत क्रांती संघटना स्थापन केली शेट्टी यांची दिल्लीला जाणारी वाट अडवून गल्लीतच रोखून धरण्याचा कार्यक्रम खोत यांनी हाती घेतला आहे . राजकारण हा आपल्या संघटनेचा पिड नसेल असेल असे खोत बोलत असले तरी त्यांच्या डोळ्यातील अंगार लपुन राहिलेला नाही.