जळगाव । येथील शेठ ला.ना.सा. विद्यालयाच्या गंधे सभागृहात मंगळवार ७ फेबु्रवारी २०१७ रोजी इ.५ ते ९ वीचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुणे अमळकर (अध्यक्ष केशवस्मृती प्रतिष्ठान तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष), अॅड.सुशील अत्रे (अध्यक्ष), डॉ.विजय दावलभक्त (उपाध्यक्ष), अॅड.विजय कुलकर्णी (सचिव), अभिजीत देशपांडे, प्रेमचंद ओसवाल, पद्मजा अत्रे, पारसमल कांकरीया, दिलीप मुथा, समन्वयक सचिन दुनाखे, मिरा गाडगीळ, विजयालक्ष्मी परांपजे, देशकर, पा.शि.संघाचे उपाध्यक्ष बाविस्कर, शाळेचे मुख्याध्यापक दुर्गादास मोरे, उपमुख्याध्यापिका वैशाली चौधरी, पर्यवेक्षक व्ही.एल.जगताप, बी.एम.साळुंखे, शिक्षक प्रतिनिधी पी.आर.राजहंस, एस.आर.देशपांडे आदिच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
मान्यवरांकडून गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक
याप्रसंगी प्रमुख अतिथींचे स्वागत सत्कार झाल्यानंतर इयत्ता ५ वी ते ९ वी या वर्गामधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे भरत अमळकर, सुशील अत्रे तसेच सन्माननीय संचालक व शालेय पदाधिकार्यांच्या हस्ते पारितोषिक देवून गुण गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे भरत अमळकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन मार्गदर्शन करतांना सांगितले की, विद्यार्थ्यांनी आपल्यातील न्युनगंड बाजुला करुन प्रचंड मेहनत करुन आपली स्वप्ने साकार करावीत. तसेच शिक्षकांनी आपल्या शैक्षणिक कार्याचे अस्तित्व निर्माण करण्याचे आवाहन केले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शाळेचे माजी पदाधिकारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, देणगीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.बी.कुलकर्णी यांनी तर पारितोषिक वितरण वाचन जे.आर.साळुंखे, ए.बी.पाटील यांनी तर अभार प्रदर्शन अमला संवत्सरे यांनी केले वंदेमातर् ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध समिती प्रमुख, उपप्रमुख, सदस्य, संगणक विभाग तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.