शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात शालांत पारितोषिक समारंभ उत्साहात

0

जळगाव । येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना. सा. विद्यालयात शालांत पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांचे हस्ते झाला. प्रमुख पाहुणे भालचंद्र पाटील तसेच कार्याध्यक्ष अ‍ॅड. सुशील अत्रे, उपाध्यक्ष अ‍ॅड. विजय कुलकर्णी, चिटणीस अभिजीत देशपांडे, विश्‍वस्त प्रेमचदंजी ओसवाल, संचालक पारसमल कांकरीया दिलीप मुथा, सतिश नाईक, श्रीनाथ देवकर, समन्वयक पद्मजा अत्रे, मीरा गाडगीळ, परांपजे, देशकर, पाठक, गांधी, अ‍ॅड. भारती इसई, सचिन दुनाखे, मुख्याध्यापक दुर्गादास मोरे, श्रीमती राजकमल पाटील, उपमुख्याध्यापक वैशाली चौधरी, पर्यवेक्षक विजय जगताप, बापू साळुंखे यांची उपस्थिती होती.

यशाचा खडतर मार्ग साधनेनेच सुलभ होतो- अ‍ॅड. सुशिल अत्रे
प्रारंभी संगीत शिक्षिका श्रीमती रेवती ठिपसे व विद्यार्थ्यांनी संस्कारगीत सादर केले. अहवालवाचन मुख्याध्यापक मोरेंनी केले. मान्यवरांच्या हस्ते शालांत परीक्षेत प्रथम संकेत प्रकाश चौधरी 96.80 व युक्ता जितेंद्र कापडे यांचा मातापित्यांचा सत्कार सुवर्णपदक देऊन करण्यात आला. कु. अश्‍विनी मोरे, प्रथम, तसेच चौधरी संकेत प्रकाश 97.80, सावदेकर अथर्व नितीन 96.40, कन्हेरे महेश प्रताप 95.40, पाटील भूषण एकनाथ 95.00, सोनार तेजस निलेश 95.00, वाघ अजय नरेंद्र 94.60 या गुणवंत विद्यार्थ्यांना व मातापित्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संकेत चौधरी व महेश कन्हेरे यांनी मनोगत केले. प्रमुख अतिथी भालचंद्र पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करुन विद्यार्थ्यांनी ध्येय निश्‍चित करुन प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन करुन विपश्यनेचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच पुढीलवर्षी कै. प्रभाकर रामदास पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गुणवंत विद्यार्थ्यांस 5 ग्रॅमचे सुवर्णपदक देण्याचे जाहीर केले. अध्यक्ष अ‍ॅड. सुशिल अत्रे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करुन सुवर्णपदक उपक्रमाबाबत ऋण व्यक्त केले. परिचय सचिन देशपांडे, सुत्रसंचालन सविता दातार, पारितोषिक वाचन प्रणिता राजहंस, आभार पर्यवेक्षक विजय जगताप यांनी केले.