शेतकरी आंदोलनात नंदुरबार येथील महिलेचा मृत्यू

0

नंदुरबार : दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी गेलेल्या लोकसंघर्ष मोर्चातील एका महिला कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली.

अक्कलकुवा तालुक्यातील अंबाबारी येथील लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्या सीताबाई रामदास दळवी वय 56 या दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलन नासाठी गेल्या होत्या, त्याची रेल्वे हुसकल्याने सर्वच आंदोलकांनी जयपूर येथे मुक्काम ठोकला. या आंदोलनातील सीताबाई तडवी यांची तब्बेत खराब झाली, सकाळी उठून त्यांनी दात घासला, त्यांनतर त्या पुन्हा झोपून गेल्या, या दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आंदोलकांकडून देण्यात आली, त्याचे शव अंबाबारी येथे आणण्यात येत असून त्यांच्यावर दुपारी बारा वाजेपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दिल्ली येथील शहाजापूर बॉर्डरवर असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्या गेल्या होत्या. लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते दिल्लीला गेले होते.