शेतकरी आणि कृषि अर्थव्यवस्थेला उभारी देणारा अर्थसंकल्प

0

 कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर

मुंबई :- कृषि क्षेत्रातील कर्ज पुरवठा, पायाभूत सुविधा मजबूत करतानाच शेतक-यांच्या उत्पादनाला दीड पट हमी भाव देवून बाजार व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा व शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.

याशिवाय सूक्ष्मसिंचन, अन्न प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय शेती आणि बांबू शेती याकरीता भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच देशात ४२ मेगा फूड पार्क विकसीत करुन शेतकरी कंपन्यांना उत्तेजन देण्यासाठी ऑपरेशन ग्रीन या योजनेसाठी भरीव निधी असलेला असा हा शेतकरीप्रणीत अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडला, त्‍याबददल त्यांचे मनापासून अभिनंदन !