शेतकरी, आदिवासींचा मोर्चा आज विधानभवनावर; मुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी निमंत्रण

0

मुंबई: आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासी समाजबांधवांचा मोर्चा मुंबईत धडकला आहे. आज विधानभवनावर हा मोर्चा धडकणार आहे. २० हजाराहून अधिक शेतकरी, आदिवासी या मोर्चात सामील आहे. शेतकऱ्यांना दुष्काळी मदत आणि आदिवासींना वन्य जमिनीचा अधिकार मेळावे यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

मुंबईकरांना त्रास होईल, म्हणून ठाण्याहून बुधवारी मुंबईच्या दिशेने निघालेला आदिवासी व शेतकऱ्यांचा मोर्चा अडवण्यासाठी पोलीस दबाव आणत आहेत, असा आरोप लोकसंघर्ष मोर्चाच्या महासचिव प्रतिभा शिंदे यांनी केला आहे. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांवरील अन्याय दूर होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसेपाटील, बाबासाहेब आढाव आणि इतर पदाधिकरी यांनी दिला. मोर्च्यात ७0 टक्के महिला सहभागी असून, बहुसंख्य लोक अनवाणीच चालत आहेत.