शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सलाईनवर!

0

दोन आठवड्यापासून शेतकरी कर्जमाफीवरून रान पेटल्यानंतर आता तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीपासून दुर्दैवीरित्या ही मागणी साईडट्रॅकवर गेलेली दिसून येत आहे. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी वर्ग आशेने विधानभवनाकडे टक लावून बसला असताना आणि कुठंतरी आस मनात घेऊन बसला असताना मुद्दा डायव्हर्ट झाल्याने शेतकाऱ्यांप्रती तळमळ ही दिखावा होती का? असंच वाटत आहे. तूर्तास तरी अर्थसंकल्पीय अधिवेशन फारच कोमात असल्यासारखे चालत आहे. आज विरोधी बाक खाली असताना देखील कामकाम करण्याचे धारिष्ट्य सरकारने दाखविले. आजचा दिवस वगळता आतापर्यंत एकूण 4-5 तासाचे कामकाज सुद्धा व्यवस्थित झालेले नाही. दोन आठवडे शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सभागृहाला वेठीस धरलेल्या विरोधी पक्षाला तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सरकारने मोठा झटका दिला आणि अर्थसंकल्पादरम्यान शेतकरी कर्जमाफीसाठी विधानसभेत गदारोळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचे 9 महिन्यांसाठी निलंबन करण्यात आले. यानंतर शेतकरी कर्जमाफीच्या मागणीलाच सुरुंग लागला की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “3” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]ताज्या घडामोडी वाचण्यासाठी लाईक करा जनशक्ति चे फेसबुक पेज[edsanimate_end]

निलंबनाच्या कारवाईनंतर विरोधी पक्षाने कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पासारख्या महत्वाच्या विषयावर चर्चा न होता मंजुरी देण्यात आली. भाजपच्या आकडयांच्या गेमची सुद्धा जोरदार चर्चा कालपासून इथं होतेय. मागील काही दिवसापासुन शिवसेना भाजपाला सत्तेतून बाहेर पडायची धमकी देतेय यासाठी भाजपने हा सेफ झोन तयार करत सेनेला आणखी गुगली दिली आहे. शिवसेना अद्याप जरी शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत असली तरी धोरणात्मक चारचा मात्र सत्तेत असूनही सेना करू शकत नाही हे सत्य आहे. सेनेच्या या भूमिकेमुळे खरोखर आश्चर्य व्यक्त करावे ही सरकार स्थापनेपासूनची सेनेचे ही सवयच आहे म्हणून चर्चा सोडून द्यावी असं तमाम शेतकऱ्यांना वाटत असेल. दुसरीकडे विरोधी पक्षाची अधिक गोची झाली आहे. तिकडे बीड मध्ये जिल्हा परिषद हातची गमवावी लागल्याने धनंजय मुंडेंवर सोशल मीडियावर टीकाटिपण्णी सुरु आहे. तर इकडे विधानसभेत विखे पाटलांना आता काय बोलावे? हा प्रश्न उद्भवत आहे. तर नारायण राणे यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त करत पुन्हा चर्चेला नवा विषय दिला आहे. आता राणे कुठं जातील? ह्या सवालावर चर्चा रंगत आहे. खरतर ज्येष्ठ सदस्य असलेल्या राणेंना अस्वस्थता खात आहे आणि हा नाराजीचा स्फोट त्यातूनच झाला आहे. शेतकरी आत्महत्येच्या चर्चेत देखील राणे यांनी धोरणात्मक चर्चेचा मुद्दा पुढं करत चर्चेची तयारी दाखविली होती मात्र काही ‘पंडित’ असलेल्या सदस्यांमुळे चर्चा होऊ शकली नाही.

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “3” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]ताज्या घडामोडी वाचण्यासाठी लाईक करा जनशक्ति चे फेसबुक पेज[edsanimate_end]

तिसऱ्या आठवड्यात आमदारांच्या निलांबनाच्या झटक्याने सुरुवात झाली. शेतकरी कर्जमाफीसाठीच्या मागणीचे ते 19 आमदार आज शेतकऱ्यांसाठी हिरो झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी काय पण म्हणत आमदार निलंबनाला क्रांतीच्या संज्ञेत मोडत आहेत. दुसरीकडे परिषदेत तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दोन्ही दिवशी शून्य कामकाज झाले. डॉक्टरांच्या आंदोलनाचे पडसाददेखील दोन दिवसांपासून सभागृहात आणि सभागृहाबाहेर उमटू लागले आहेत. या सर्व गोंधळात शेतकऱ्यांची कर्जमाफी मात्र सलाईनवर लागली आहे हे निश्चित.

निलेश झालटे 9822721292