शेतकरी कर्जमाफीच्या अर्जांसाठी नियोजन करा

0

भुसावळ । छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकरी कर्ज माफीची घोषणा शासनाने केली आहे. मात्र शेतकर्‍यांना या योजनेचे अर्ज भरण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हे अर्ज भरण्यासाठी शासनाने नियोजन करावे अशा मागणीचे निवेदन युवा शिवसेनेतर्फेतहसिलदारांना देण्यात आले. निवेदनात नमुद करण्यात आले की, शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अर्ज भरुन घेण्यासाठी शासनाने तालुकाभरात कोणतेही नियोजन केलेले नाही. बाहेरुन अर्ज भरण्यासाठी शेतकर्यांना 200 ते 400 रूपये भुर्दंड बसत आहे. या प्रकाराकडे शासन व अधिकार्यांचे दुर्लक्ष आहे.

निवेदन देतांना यांची होती उपस्थिती
तालुकाभरात काही शासकीय अधिकार्‍यांच्या आशिर्वादाने हे काम सुरु आहे. आधीच शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. अशा संकटात सापङलेल्या शेतकर्‍यांच्या पाठिशी शासनाने ठामपणे उभे रहावे व पारदर्शी कारभराची हमी द्यावी अन्यथा युवा सेनेतर्फे तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अविनाश पाटील, शहर प्रमुख राकेश घोरपडे, निलेश पाटील, मयुर पाटील, अजय पाटील, जगदिश पाटील, दिपक महाजन, गौरव पाटील, शेख मेहमुद, शेख मोसिन, शेख अफसर, शेख आदिल, जयेश पाटील, समाधान महाजन आदींच्या स्वाक्षर्या आहेत.