मुक्ताईनगर। शासनाने शेतकर्यांना कर्जमाफीची घोषणा केली आहे. मात्र अद्यापही काही शेतकर्यांना याचा मिळाला नसून काँग्रेसतर्फे ‘माझी कर्ज माफी झाली नाही’ अभियानाचा मुक्ताईनगर येथे काँग्रेस जिल्हाध्यक्ष संदिप पाटील यांच्याहस्ते शेतकर्यांचा अर्ज भरुन सुरुवात केली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष एस.ए. भोई, जिल्हा चिटणीस अजाबराव पाटील, जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील, प्रभाकर पाटील, युवक लोकसभा अध्यक्ष हितेश पाटील, तालुका अध्यक्ष आत्माराम जाधव, महिला तालुकाध्यक्ष कुसुम पाटील, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सालिम खान, युवक विधानसभा अध्यक्ष निरज बोराखेडे, तालुका उपाध्यक्ष सोपान दुट्टे, राजू चौधरी माजी तालुकाध्यक्ष रविंद्र कांडेलकर, अरविंद गोसावी, शहराध्यक्ष आलम शहा, प्रभुदास जाधव, निलेश पाटील ,सूप राव देशमुख, अरुण कांडेलकर, फिरोज खान उपस्थित होते.
अर्जात या माहितीचा समावेश
काँग्रेसचे ‘माझी कर्ज माफी झाली नाही’ अभियानाच्या अर्जात शेतकर्याची संपूर्ण माहिती ज्यात नाव, गाव, शेतीचे क्षेत्र, परिवारातील सदस्य संख्या, परिवारात नोकरी नसल्याची माहिती, कर्जाचे साल कर्ज प्रकार, कर्ज देणारी संस्था व कर्ज थकीत रक्कम अशी माहिती असल्याने खरोखर कर्जबाजारी शेतकर्याला न्याय देण्याचा प्रयत्न काँग्रेसतर्फे केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे.