जळगाव । शेतकरी कर्जमाफीचा असलेला फसवी घोषणा व शेतकर्यांना वेठिस धरून त्यांच्या न्याय हक्काना डावलण्याच्या नवनवीन तरतुदी यांचा आढावा घेण्याच्या उद्देशाने 26 ला नूतन मराठा महाविद्यालयाच्या बोस सभागृहात होणार्या राज्यव्यापी शेतकरी कर्जमुक्ती व हमीभाव शेतकरी परिषेदेच्या आयोजनाच्या तयारीला जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी, हमाल, रिक्षा चालक, समविचारी संघटना, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, बुद्धीजीवी वर्ग एकत्र येत चालला आहे. शेतकरी कर्जमुक्ती व हमीभाव शेतकरी परिषेदेच्या आयोजनाच्या उद्देशाने आतापर्यंत विविध ग्रामीण भागात 300 पेक्षा जास्त सभा व सामिजिक माध्यमांवर या सगळ्या शेतकरी रोष दिसून येत आहे.
26 सप्टेंबर रोजी होणार परीषद
राज्य सरकार रोज नवीन घोषणा करून शेतकर्यांना वेठिस धरत आहे. यामुळेच सुकाणू समिती देखील राज्यव्यापी शेतकर्याशी सवांद साधत शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी एकत्र येत आहे. शेतकर्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळावा व त्याला पूर्ण कर्जमाफी मिळावी याकरिता सर्व समाज घटक मंगळवार 26 सप्टेंबरला होणार्या परीषदेकरिता आपआपल्या परीने एकत्र येत आहे. या परीषदेकरिता जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व उपस्थित राहण्याचे आवाहन परीषदेच्या निमत्रक व सुकाणू समितीच्या सदस्या प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, मुकुंद सपकाळे, खलील देशमुख, एस.बी.पाटील, प्रदीप देसले, विवेक रणदिवे, संजय घुगे, दिलीप सपकाळे, शरद चौधरी, संदीप घोरपडे, कॉ.विजय पवार, किरण भोळे, हेमंत पाटील, सुजित पाटील, सचिन सोमवंशी यांनी केले आहे.