शेतकरी केंद्रबिंदू समजून राज्याची विकासाकडे वाटचाल

0

जळगाव । शेतकरी सुखी तर देश सुखी या तत्वानुसार शेतकर्‍याला सुखी ठेवण्यासाठी विकासाच्या विविध योजना राज्य शासन आखीत असून या योजनांच्या माध्यमातून शेतकर्‍याला कर्जमुक्तीकडे नेण्यात येत आहे. सर्वसामान्यांसाठी विकासाच्या योजना राबवून राज्याची विकासाकडे वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या 70 वा वर्धापन दिन समारंभानंतर येथील नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

सत्कार समारंभ कार्यक्रमात यांची होती उपस्थिती
कार्यक्रमात जि.प.अध्यक्षा उज्वलाताई पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील, चिटणीस मंदार कुलकणी, पुरवठा अधिकारी राहुल जाधव, तहसीलदार अमोल निकम यांचेसह स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरीक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरीक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या नागरीकांसह शष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2017 मधील राज्य गुणवत्ता धारक विद्यार्थी, प्रशासकीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक जाहिर झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यांचा झाला सत्कार
पालकमंत्र्यांच्या हस्ते कृषि विभागात उत्कृष्ट कार्य केलेले जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, उपविभागीय कृषि अधिकारी नारायण देशमुख, तालुका कृषि अधिकारी विजय भारंबे, दिपक ठाकूर, बाळासाहेब व्यवहारे, कृषि अधिकारी लक्ष्मण तळेले यांच्यासह कृषी सहाय्यकांचा सत्कार करण्यात आला. तसेच रावेर तालुक्यातील मोहमांडली जुनी येथील गफुर तडवी, समशेरदल्लु तडवी, रमजान गेंदा पावरा, मेहरबान दगडु तडवी या चार शेतकर्‍यांना दोषमुक्त संगणकीकृत सातबार्‍याचे वितरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.