शेतकरी पती-पत्नीची आत्महत्या

0

परभणी : पाथरी तालुक्यातील आनंदनगर येथे आज (बुधवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास लक्ष्मण जेसू पवार (वय 60) व त्यांची पत्नी चपलाबाई लक्ष्मण पवार (वय 45) या पती-पत्नीने राहत्या घरी किटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केली. लक्ष्मण पवार यांना पाथरी येथील शासकीय रुग्णलयात तर चपलाबाई यांना सोनपेठ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वी दोघेही मृत्युमुखी पडले होते.