मुंबई- सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवीत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. कर्जमाफी घोषित करून १४ महिने झाले, मात्र अद्यापही अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. कधी मिळणार या शेतकऱ्यांना कर्जमाफी? कर्जमाफीचे गाजर आणखी दाखवू नका. कारण आता वेळ भरली आहे. हे शेतकरी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. ट्वीटरवरून अजित पवार यांनी टीका केली आहे.
आज १४ महिने झाले तरीही कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या पदरी प्रतीक्षाच. कधी मिळणार या शेतकऱ्यांना कर्जमाफी? कर्जमाफीचं गाजर आणखी दाखवू नका. कारण आता वेळ भरली आहे. हे शेतकरी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, हे लक्षात ठेवा. @CMOMaharashtra https://t.co/iFTl6PQgSh
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 25, 2018