शेतकरी, महिलांच्या प्रश्नांवरून भाजपचे राज्यव्यापी आंदोलन !

0

मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला विरोधात बसावे लागले. आता भाजपकडून महाविकास आघाडीच्या सरकारविरोधात आंदोलनाची तयारी सुरु केली आहे. आज मुंबईत भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शेतकरी आणि महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. २२ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात दोन महिन्यापूर्वी भाजपचे सरकार होते, त्यावेळी भाजपने शेतकऱ्यांना काहीही दिले नाही, आता दोन महिन्यानंतर लागलीच भाजपकडून नव्या सरकारला विरोध होत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.