रासायनिक खतावर बहिष्कार, रासायनिक कीटकनाशकांवर बहिष्कार केल्यास शेतकर्यांचा उत्पादन खर्च 70% कमी होतो. त्यामुळे शेतकर्याला कर्ज घ्यावे लागत नाही. पिकाचे चांगले वाईट काही झाले, तरी नुकसान फार होत नाही. वाशीम जिल्ह्यातील जामदार गावात मी शेतकर्यांना रासायनिक खत आणि कीटकनाशक बंद करायला सांगितले व नैसर्गिक शेती करायला सांगितली. शेतकर्यांनी बंद केले. पण नैसर्गिक शेतीसुद्धा केली नाही. दुर्दैवाने पाऊसच नव्हता. म्हणून पीक नीट आले नाही. नुकसान झाले, पण फार कमी झाले. म्हणून झळ पोहोचली नाही.
या बाबींची विस्तृत चर्चा 29 ऑक्टोबरला मुंबईत झाली. पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या अध्यक्षतेखाली, पद्मभूषण विजय भटकरजींनी चर्चा सत्राचे उद्घाटन केले. शेती तज्ज्ञ रमेश ठाकरेंनी शेती काल, आज आणि उद्या या विषयावर विस्तृत मांडणी केली. त्याच विषयावर पुस्तकाचे अनावरण झाले. रासायनिक खते आणि कीटकनाशकांचे समूळ उच्चाटन भारताच्या शेतीमधून करणे हे प्रथम लक्ष ठेवण्यात आले. महाराष्ट्रातील जवळ जवळ 30,000 शेतकर्यांनी नैसर्गिकरीत्या शेती यशस्वी केल्याचे निदर्शनात आले. अनेक शेतकर्यांनी आपले अनुभव कथन केले. नैसर्गिक शेतीचे उत्पादनाचा भाव शेतकरी ठरवतो आणि दाम दुप्पट किंमत मिळते. या सर्व यशाची गाठ वेबसाइटवर घालण्यात येत आहेत तसेच प्रात्यक्षिके बघण्यासाठी शिवार फेरी काढण्यात येत आहे. 5 ते 8 नोव्हेंबर अकोट ते अकोला, अमरावती शिवार फेरी काढण्यात येत आहे. त्यात सर्व शेतकर्यांनी भाग घ्यावा. 11 ते 16 नोव्हेंबर दापोली येथे पूर्ण शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी शिबिरदेखील आयोजित करण्यात आले आहे. शून्य खर्च नैसर्गिक शेती (नइछऋ) या सिद्धांतावर विश्वास ठेवणे कठीण आहे. म्हणून प्रत्यक्ष बघणे हाच मार्ग आहे, असे ठरले. शाश्वत शेती हा एकमेव मार्ग भविष्यातील शेतीसाठी विकसित करणे हेच नइछऋ चे उद्दिष्ट आहे.
नइछऋ चे शास्त्र हे जंगलावर आधारित आहे. जंगलात कुणी खत घालत नाही. कुणी पाणी देत नाही. पण जंगल वाढतच राहते तसेच शेतीतसुद्धा खत घालण्याची गरज नाही. 1 एकरासाठी 200 लीटर पाण्यात 10 किलो देशी गायीचे शेण, 5 लीटर गोमुत्र, 1 किलो काळा गूळ आणि 1 किलो बेसन, मूठभर माती याचे मिश्रण करायचे. 2 दिवस सावलीत ठेवणे. 7 दिवसांच्या आत वापरणे, असे जीवामृत बनते. ते 15 दिवसांतून एकदा फवारणी किंवा इतर सिंचनाच्या पद्धतीने शेतात वापरायचे. बागेत, सुपारी, दालचीन, काळी मिरी, हळद, मिरची, शेंगा, शेवगा अशी आंतरपिके लावली. याला प्रचंड यश आले. 1 एकरमध्ये 4 लाख रु. कमावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भातामध्ये उत्पादन 25% वाढले आणि उत्तम प्रतीचे भात पीक आले. यावर्षी आम्ही बासमती तांदूळ पण घेत आहोत तसेच कीटकनाशके फारच परिणामकारक झाली. हे शेतातच बनवले. ब्रह्मास्त्र, निमास्त्र आणि आंबट ताकासारखे कीटकनाशक नइछऋमध्ये वापरले जातात. आंबा, काजू, भाजीपाला अगदी उत्तम प्रकारे कमी खर्चात उत्पादित होतो. एकंदरीत रासायनिक शेती बंद आणि निसर्ग शेती सुरू ही चळवळ उभारली जात आहे. पाळेकर गुरुजींची शिबिरे पूर्ण देशात होत आहेत. पहिला गट मुंबई येथे शिवाजी मंदिर येथे 23 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. 21 ते 28 जानेवारीमध्ये नइछऋ चे महाअधिवेशन मुंबईत घेण्यात येत आहे. त्यात शेतकरी मित्रांचा मोठा कार्यक्रम सुरू होईल. त्यात शेतकरी मित्र गट आणि शेतकरी गट एकमेकांशी संवाद साधतील. एकंदरीत नइछऋचे सर्व लोक एकमेकांना भेटतील. माझी सर्व शेतकरी संघटनाना विनंती आहे की न पाहता विरोध करू नका. हरितक्रांतीसाठी स्वामिनाथनना इंदिरा गांधींनी पूर्ण मोकळीक दिली. अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी रासायनिक शेती आली. त्याकाळची ती गरज होती. पण आज आपण फक्त ूनइछऋशेती यशस्वीरीत्या करू शकतो. अशाच प्रकारची शेती आम्ही लहानपणी केली होती. तेव्हा कोणी आत्महत्या केलेली मी बघितली नाही. पण याला विरोध करणार्यांना खत कारखाने, बियाणाचे कारखाने, मोन्सेनटो मदत करत आहेत. काही दलाल आहेत, तर काही अज्ञानापोटी करत आहेत.
स्वामिनाथन यांना मी सिंधुदुर्गात 2 वर्षांपूर्वी बोलावले होते. त्यांनीदेखील रासायनिक शेतीपासून नैसर्गिक शेतीकडे वळण्यास सांगितले. विजय भटकर यांनी उन्नत भारत मिशनमध्ये नइछऋचाच पुरस्कार केला आहे. आता त्यांच्या नेतृत्वाखाली आपण प्रत्येक गाव स्वावलंबी बनवण्याचा निर्धार केला आहे. जागतिक बँकेने भारताला धंदा करण्यासाठी सोपा देशात भारताला तुम्ही शाश्वत शेती करा, संघटित व्हा, ग्राहकांना संघटित करून शेतकरी मित्र करा. थेट आपल्याच शहरातील बांधवांना विक्री करा. विषमुक्त अन्न निर्माण करा. लोकांना कॅन्सर, मधुमेह, हृदयविकार, रक्तदाबाची भेट तुम्ही उत्पादित केलेल्या मालावर देऊ नका. पुढची पिढी शाश्वत बनवा.
– ब्रिगेडिअर सुधीर सावंत
9987714929