शेतकरी ,वारकरी- कष्टकरी महासंघाचे वतीने ” शेतकरी वाचवा- आक्रोश अभियान “
करीता नागपूर येथे बैठक संपन्न झाली. - धनंजय पाटील कांकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती साठी व शेतकऱ्यांना न्याय व हक्क , शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा आश्रम, आग्याराम देवी चौक, सुभाष रोड नागपूर येथे दि. 16 सप्टे. 2023 शनीवारला शेतकरी, वारकरी- कष्टकरी महासंघाची बैठक पार पडली. संपूर्ण विदर्भाच्या 11 जिल्ह्यातून एकूण तीन टप्प्यात
” शेतकरी वाचवा- आक्रोश अभियान.” पहिला टप्पा दि.15 ऑक्टो.ते 22आक्टो. , व दुसरा टप्प्याची सुरुवात 25 ऑक्टो.ते 31 ऑक्टो.पर्यंत, तसेच तिसरा टप्प्याची सुरुवात 2 नोव्हें. ते 8 नोव्हेंबर 2023 पर्यंत काढण्यात येणार आहे . या रॅलीच्या पूर्वनियोजित तयारीसाठी पुन्हा 2ऑक्टोबर 2023 ला श्री गुरुदेव सेवाश्रम नागपूर येथेच दुसऱ्या बैठकीचे आयोजन केले आहे. अशी माहिती देताना सरसेनापती श्री धनंजय पाटील काकडे, यांनी स्वतंत्र शेतकरी मंत्रालयाची व कर्जमुक्तीची भूमिका समजून सांगितली. पुढे ते म्हणाले- १)शेतीत उत्पादन वाढविण्यासाठी कृषी मंत्रालय झाले. २)जमिनीचे रेकॉर्ड व शेतीचा कारभार पाहण्यासाठी महसूल मंत्रालय झाले. ३) या देशात श्रम मंत्रालय झाले.४) औद्योगिक विस्तारासाठी उद्योग मंत्रालय झाले.५) राज्यात अपंग मंत्रालय झाले, ६) जमिनीचे मोजमाप होण्यासाठी स्वतंत्र भूमी अभिलेख कार्यालय सुरू झाले, पण.. ७) जगाचा पोशिंदा, बळीराजा, अन्नदाता, अशी शेतकऱ्याला टपोरी विधाने, उपमा देऊन मात्र मातीत घालणारी यंत्रणा राज्य व केंद्र सरकारने सुसज्ज ठेवली, तशा पद्धतीची सरकारने धोरणे आखून बळीराजाला पाताळात घातले .पण शेती वाहत असताना मात्र शेतकऱ्याला स्वतःसाठी जगण्याचा अधिकार व हक्क मिळवता आला नाही, त्याला न्याय दिला गेला नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. शेतीची मशागत करीत असताना, त्याला येणारे आर्थिक व सामाजिक प्रश्न, शेतीतील भाऊबंदकीचे वाद ,शेतीचे रस्ते, इतर शेतकऱ्यांच्या जीवनात कौटुंबिक समस्या निर्माण झाल्यात . शेतीमालाला भाव मागितला तर शासनाच्या व कायद्याच्या नजरेत आजही तो गुन्हेगार आहे. त्याच्या सुख सुविधा साठी त्याला कर्जातून मुक्त केल्या जात नाही, स्व. शरद जोशींनी आखलेला मास्टर प्लॅन लागू होत नाही. तर या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी कोर्टात जावे लागते व तिथे सुद्धा निकाल दुरापास्त झाला आहे. खरे आणि खोटे प्रश्न एका तराजूत तोलले जात आहे. त्यामुळे बळीराजाला ,पोशिंदा
ला ,व अन्नदात्याला, जीवन जगणे दुरापास्त झाले आहे, तो या जीवनाला कंटाळला आहे. म्हणूनच दररोज शेतकरी आत्महत्या वाढत आहेत.आता त्यासाठी फक्त ” स्वतंत्र शेतकरी मंत्रालय” हाच एक पर्याय आहे. प्रत्येक राज्यात व केंद्रात सुद्धा स्वतंत्र शेतकरी मंत्रालय स्थापन व्हावे अशी शेतकरी नेते धनंजय पाटील काकडे यांनी मागणी केली . हेल्पिंग फाउंडेशनचे अध्यक्ष गौरव गायगवळी म्हणाले – आजही जनता गणपती, दुर्गादेवी, शिवजयंती, भीम जयंती, भागवत सप्ताह, इत्यादी अनेक धार्मिक कार्यक्रमावर खर्च करते, त्याच प्रकारे जर शेतकरी या जिवंत प्राण्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ” शेतकरी वाचवा आक्रोश अभियानाला” सुध्दा शेतकरी, वारकरी- कष्टकरी महासंघाच्या खात्यावर व किंवा फोन पे करून आर्थिक मदत करावी. देणगी व इतर पद्धतीने अभियानासाठी प्रत्येक गावोगावी मदत व्हावी, सर्व स्तरातून आर्थिक मदत व्हावी ,अनुदान द्यावे, तसेच संपूर्ण विदर्भ मध्ये हे अभियान यशस्वी व्हावे ,असे त्यांनी जनतेला आव्हान केले. आजच्या बैठकीला सीतामाता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री चंद्रकांत उर्फ बाळासाहेब देशमुख रावेरीकर, महिला आघाडीचे प्रमुख श्रीमती डॉ.रेखाताई निमजे. , श्री मिथुन मोहरकर ,श्री सुधीरभाऊ नलवाडे, निखिल भाऊ कांबळे. श्री गुरुदेव संप्रदायाचे श्री डहाके साहेब नागपूर, या सर्वांनी मार्गदर्शन केले, कार्यक्रमाला संपूर्ण विदर्भातून आलेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.या सामाजिक कार्याला उपस्थितानी पाठिंबा देण्याचे मान्य केले , श्री मिथुन मोहरकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले .
सूचना:-
उपरोक्त बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकांमध्ये प्रसिद्ध करण्यात यावी, ही विनंती.
आपला नम्र-
धनंजय पाटील काकडे,9890368058.