अकोला: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. दरम्यान आज राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची अकोला येथे प्रचार सभा सुरु आहे. यावेळी त्यांनी भाजपसह महायुतीवर जोरदार टीका केली. युती सरकार शेतकरी विरोधी असून त्यांना या निवडणुकीत जागा दाखवा असे आवाहन शरद पवारांनी केले.
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव नाही, महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कारखाने बंद पडले, उद्योग धंदे बंद पडले याला सरकारच जबाबदार आहे असे सांगून हे सरकार घाला असे आवाहन शरद पवारांनी मतदारांना केले. कर्ज माफी केल्याचे सरकार सांगत आहे, मात्र ६९ टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालाच नाही असेही त्यांनी सांगितले.
एकीकडे नोकरी नाही ते देणे सोडून आहे त्या नोकऱ्या घालण्याचे काम सरकारने केले.