नगर : राज्यातील शेतकरी येत्या 1 जूनपासून संपावर जाणार आहेत, याबाबतचा इशाराच शेतकर्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर बैठका घेण्यासही सुरुवात केली आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने नगर जिह्यातील शेतकर्यांनी संपावर जाण्याचे ठरवले आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे सर्व शेतकर्यांनी शेतमालाला योग्य भाव द्या, अन्यथा शेतमाल विकणार नाही आणि पिकवणारही नाही, अशी भूमिका घेत संपावर जाण्याचा इशारा दिला. विशेष ग्रामसभा घेत याबाबतचा ठरावही केला आहे. अहमदनगर जिह्यातील पुणतांबा गावातून शेतकर्यांच्या आंदोलनाला सुरुवात होणार असून, त्यासाठी 3 एप्रिलला शेतकरी पुणतांब्यामध्ये दाखल होणार आहेत. शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात या संपात सहभागी व्हावे, यासाठी आवाहनही करण्यात येत आहे.